सोलापूर जिल्ह्यात वाढतोय अजगरांचा अधिवास
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीपाठोपाठ आता अक्कलकोट तालुक्यात अजगर आढळला आहे. त्याआधी 2020 आणि 2022 मध्ये अक्कलकोट तालुक्यात अजगर सापडल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजगरांचा अधिवास वाढत असल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात वाढतोय अजगरांचा अधिवास


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीपाठोपाठ आता अक्कलकोट तालुक्यात अजगर आढळला आहे. त्याआधी 2020 आणि 2022 मध्ये अक्कलकोट तालुक्यात अजगर सापडल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अजगरांचा अधिवास वाढत असल्याचे दिसत आहे. त्याशिवाय सोलापूरच्या सर्प वैभवातही भर पडली आहे.

धोत्री येथे एक 7.5 फूट लांबीचा अजगर आढळल्यानंतर, आता अक्कलकोटपासून 7 किलोमीटरवर असलेल्या हत्तीकणबस या गावात दुर्मीळ अजगर दिसून आला आहे. याची लांबी 8.5 फूट आहे. हत्तीकणबस येथील अजगरास नाग फाऊंडेशनचे सर्पमित्र भूकंप जोशी यांनी सुरक्षितपणे पकडले. याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना देण्यात आली. शिंदे यांनी या रेस्क्यूची माहिती वनविभागास कळवत नाग फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार सोबत घटनास्थळी दाखल झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande