
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
दहशतवादविरोधी पथकाने अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित जुबेर हंगरगेकर याला अटक केली आहे. तो मूळचा सोलापूरचा असून तो १८ ते २० ऑक्टोबरला कुंभारी हद्दीतील शाळेत एका कार्यक्रमासाठी आला होता. तेथे १६ ते १८ वयोगटातील मुलांना त्याने धार्मिक धडे दिले. या कार्यक्रमात ते तीन दिवस काय बोलला याची पडताळणी करण्यासाठी ''एटीएस''ने त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मागितले आहेत.
वहादते मुस्लीम- ए- हिंद या संघटनेच्या पुढाकारातून शाळेने तो कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रम वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर होता, असे सुरुवातीला सांगण्यात आले. पण, त्यात विद्यार्थ्यांना कुराण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन झाले. पोलिसांनी तेथील मुलांकडून ही माहिती मिळविली आणि ‘एटीएस’ला दिली. त्यानंतर आता कार्यक्रमाचे व्हिडिओ मागविले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड