राज्य मुख्य सचिव शनिवारी नाशिक दौऱ्यावर
नाशिक, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार (दि.८) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कुंभमेळा कामांचा सविस्तर आढावा घेणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयात कुंभमेळा बैठकीचे आयोजन करण्यात
राज्य मुख्य सचिव शनिवारी नाशिक दौऱ्यावर


नाशिक, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार (दि.८) नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कुंभमेळा कामांचा सविस्तर आढावा घेणार असून, विभागीय आयुक्त कार्यालयात कुंभमेळा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी १६ ऑक्टोबरला मुख्य सचिवांनी मुंबईत कुंभमेळा बैठक घेतली होती. यात प्राधिकरणाने कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी कालावधी निश्चित करावा, तसेच कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा आणि कार्यारंभ आदेश प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानूसार महिनाभरात प्राधिकरणाने काय कार्यवाही केली या विषयावर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.

केवळ बैठकांचा सोपस्कार

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका होत असून प्रत्यक्ष एकाही कामाला अद्यापर्यंत सुरुवात झालेली नाही. २५ हजार कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी ७ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला. मात्र सिंहस्थ कामांना अद्याप सुरूवात झाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande