
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात युट्यूब चॅनल्स, विविध समाजमाध्यम तसेच प्रसार माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.
परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार सर्वस्वी जबाबदार असतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु