दामिनी पथकाच्या मार्गदर्शनाखाली गाणी येथे ‘सखी जल्लोष’ रंगला
रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : ग्रामपंचायत गाणी, दि प्राईड इंडिया संस्था आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “सखी जल्लोष” हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या आत्मविकास, स्वसंरक्षण आणि आनंदोत्सवाचा संग
: ग्रामपंचायत गाणी, दि प्राईड इंडिया संस्था आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “सखी जल्लोष” हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गाणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या आत्मविकास, स्वसंरक्षण आणि आनंदोत्सवाचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील अधिकारी कांचन जवान, ऋतुजा शिरतोडे, प्रतीक्षा कानवडे आणि गौरी शिंदे या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि समाजातील समान स्थान या विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आदित्य कासरुंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात “सखी जल्लोष हा महिलांच्या दैनंदिन धावपळीतून आनंद आणि आत्मविश्वास पुनश्च शोधण्याचा सुंदर उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व आदिशक्ती अभियान या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  दि प्राईड इंडिया संस्थेचे तालुका प्रकल्प समन्वयक किशोर शितोळे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांमध्ये एकात्मता आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना स्मार्ट वॉच, सोलर लॅम्प आणि थर्मास वॉटर बॉटल अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.  या प्रसंगी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश धाडवे, उपसरपंच सुभाष उजळ, सुदाम शेडगे, आत्माराम रहाटवल, तसेच दि प्राईड इंडिया संस्थाचे राज कावनकर, आर्यन येलवे आणि तालुक्यातील सर्व समन्वयक उपस्थित होते. गाणी ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम भविष्यात दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : ग्रामपंचायत गाणी, दि प्राईड इंडिया संस्था आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने “सखी जल्लोष” हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या आत्मविकास, स्वसंरक्षण आणि आनंदोत्सवाचा संगम असलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील अधिकारी कांचन जवान, ऋतुजा शिरतोडे, प्रतीक्षा कानवडे आणि गौरी शिंदे या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या स्वसंरक्षण, आत्मविश्वास आणि समाजातील समान स्थान या विषयांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच आदित्य कासरुंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात “सखी जल्लोष हा महिलांच्या दैनंदिन धावपळीतून आनंद आणि आत्मविश्वास पुनश्च शोधण्याचा सुंदर उपक्रम आहे,” असे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व आदिशक्ती अभियान या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि प्राईड इंडिया संस्थेचे तालुका प्रकल्प समन्वयक किशोर शितोळे यांनी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांमध्ये एकात्मता आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या महिलांना स्मार्ट वॉच, सोलर लॅम्प आणि थर्मास वॉटर बॉटल अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

या प्रसंगी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश धाडवे, उपसरपंच सुभाष उजळ, सुदाम शेडगे, आत्माराम रहाटवल, तसेच दि प्राईड इंडिया संस्थाचे राज कावनकर, आर्यन येलवे आणि तालुक्यातील सर्व समन्वयक उपस्थित होते.

गाणी ग्रामपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम भविष्यात दरवर्षी आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande