
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील उकृष्ट कामगिरी केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र, या पुरस्काराकडे प्राथमिक शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत. त्या पुरस्काराचे वितरण केव्हा होणार, याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.पाच सप्टेंबरला शिक्षकदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील 25 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तरीही पुरस्काराचे वितरण अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड