सोलापूर जिप समाज कल्याणचा पदभार प्रसाद मिरकलेंकडे
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ही काही घडामोडी घडत आहेत. समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार यापूर्वी शासनाच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे होता तो पदभार
सोलापूर जिप समाज कल्याणचा पदभार प्रसाद मिरकलेंकडे


सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ही काही घडामोडी घडत आहेत. समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार यापूर्वी शासनाच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे होता तो पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढल्याचे समजले असून आता समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे देण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यकाळात सुद्धा समाज कल्याणचा पदभार प्रसाद मिरकले यांच्याकडे देण्यात आला होता.

समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद समाचार कल्याण अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. मात्र तो आता पदभार मिरकले यांच्याकडे देण्यात आला आहे.तसेच दिव्यांग कल्याण विभागाचा पदभारही सोनवणे यांच्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याला देण्यात येणार असल्याचेही माहिती आहे. दिव्यांग कल्याण विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली येतो त्यामुळे तो चार्ज कुणाकडे जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande