सोलापुरात उभारला रुक्मिणी मॉल; बचत गटाच्या वस्तू एकाच ठिकाणी मिळणार
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत लोकार्पण
rikamni


सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.

यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जगंम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी’ संदीप कोहिनकर यांच्यासह इतर मान्यवर व उमेद स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला- भगिनी आणि नागरिक उपस्थित होते. महिला बचत गटांच्या हातातून तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या मिनी शॉपिंग मॉलचे उद्दिष्ट आहे. यातून त्यांच्या परिश्रमाला योग्य सन्मान मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल अशी अपेक्षा गोरे यांनी व्यक्त केली.

एकंदरीत हि एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ बनली आहे. याला राज्यभरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, या निमित्ताने ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.उमेदच्या माध्यमातून हजारो महिला स्वयंसहायता गटांनी (बचत गट) तयार केलेल्या उत्पादनांसाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande