कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार : दिपकआबा साळुंखे-पाटील
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सांगोला शहर तसेच परिसरात अनेक वर्षे एकत्रितपणे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आगामी निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यात येई
कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार : दिपकआबा साळुंखे-पाटील


सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सांगोला शहर तसेच परिसरात अनेक वर्षे एकत्रितपणे कार्यरत राहिलेले ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आगामी निवडणुकीसंदर्भात पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, तसेच युती किंवा आघाडीबाबतचा निर्णयही या बैठकीतच ठरवला जाईल, असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी केले.

यावेळी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार साळुंखे-पाटील यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत साळुंखे-पाटील यांना सुमारे पन्नास हजारांपेक्षा जास्त मते मिळाली होती. निवडणुकीनंतर त्यांनी कोणत्याही पक्षाशी संलग्न न राहता काम सुरू ठेवले होते. सध्या ते भाजप किंवा इतर कोणत्या पक्षात जातात याकडे चर्चांना जाणारे आहे. गतनगरपालिका निवडणुकीत सांगोला शहरात सर्वाधिक नगरसेवक निवडून देत दिपकआबा साळुंखे यांच्या गटाने आपले बळ दाखवले होते. त्यामुळे या निवडणुकीत आबा कोणत्या पक्षासोबत किंवा गटासोबत आघाडी करतात, हे सांगोला नगरपरिषदेच्या राजकारणातील समीकरण ठरवणारे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande