
मुंंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि. ७ नोव्हे.) राजभवन येथे संपूर्ण 'वंदे मातरम' गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.
राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी 'वंदे मातरम'चे सामूहिक गायन केले.
सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'वंदे मातरम् ' या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राजभवन येथे 'वंदे मातरम्' या गीताच्या सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर