पुणे - बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। ऊसतोडणी हंगामात बिबट्याच्या हालचालींचा वाढता धोका लक्षात घेऊन, साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने पती-पत्न
पुणे - बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना


पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। ऊसतोडणी हंगामात बिबट्याच्या हालचालींचा वाढता धोका लक्षात घेऊन, साखर आयुक्तालयाने सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने पती-पत्नी कामगार ऊसतोडणी करीत असताना, त्यांच्या मुलांच्या संगोपनाची, तसेच शिक्षणाची व्यवस्था करण्यासह शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वनविभागाच्या मदतीने बिबट्याच्या अधिवासाची माहिती देणे, शेताऐवजी सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय करणे, झोपड्यांना संरक्षण देण्याबाबतही सूचना केल्या आहेत. राज्यात ऊसगाळप हंगाम सुरू असून, ऊसतोडणी सुरू झाली आहे. बिबट्याचा अधिवास हा ऊस क्षेत्रात वाढल्याने मानवी वस्तीवर हल्ल्यांचे प्रमाण काही दिवसांपासून वाढले आहे. ऊसतोडणीवेळी काय काळजी घ्यावी, तसेच कारखान्यांनी कोणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, याची नियमावली साखर आयुक्तालयाने सर्व कारखान्यांना पाठवली आहे.

ऊसगाळप सुरू झाला असल्याने बिबट्याचा धोका टाळण्यासाठी ऊसतोडणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समूहाने काम करावे. बिबट्याचा अधिवास असलेल्या भागातील ऊसक्षेत्रात वनविभागाने जनजागृती, त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande