
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘वंदे मातरम’च्या सुरावटींनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या उपक्रमातून पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड