पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशे
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन


पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।‘वंदे मातरम्’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामुहिक गायन करण्यात आले.

‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशे वर्षे पूर्तीनिमित्त दिल्ली येथे करण्यात आलेल्या ‘वंदे मातरम’ गीताच्या सामूहिक गायन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये पुणे येथून डॉ. पुलकुंडवार, अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande