
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
घरी कोणी नसताना घरामध्ये प्रवेश करून लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बार्शी तालुक्यातील एका गावात घडला. याप्रकरणी पृथ्वीराज संजय चांदणे (वय 22) या विवाहित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.
पीडितेची आई, वडील, भाऊ असे एकत्रित राहत असून ते मजुरी करतात. पीडिता ही चांदणे यास गेल्या दोन वर्षांपासून ओळखत होती. त्या ओळखीमधून तो अधूनमधून तिच्या घराकडे ये-जा करत होता. मागील चार महिन्यांपूर्वी पीडिता घरी एकटीच असताना पृथ्वीराज घरी आला. त्याने पीडितेस विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दाखविले व अत्याचार केला. पीडितेच्या पोटात जास्त दुखत असल्याने ती आईसोबत बार्शीत आली. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत हा प्रकार समोर आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड