बीड विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान
बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबविण्यात येत आहे. बीड विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक येथील
नाशिक येथील मुल्यांकन समिती हे सर्व्हेक्षण करणार


बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबविण्यात येत आहे. बीड विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक येथील मुल्यांकन समिती हे सर्व्हेक्षण करणार आहे.

या पार्श्वभूमीवर बीड आगार प्रशासन स्थानक परिसराची धूळ झटकण्यासाठी स्वच्छतेच्या कामाला लागले आहे. स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई, परिसरातील गवत काढणे आणि पथदिव्यांची दुरुस्ती अशी कामे गतीने सुरू आहेत.

विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व्हेक्षण समितीला सादर करण्यासाठी मास्टर कंट्रोल चार्ट, नोंदवही, बसस्थानक भेट नोंदवही आणि इतर संबंधित कागदपत्रांची तयारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande