भाजप नेत्या अर्चना चाकूरकर लातूर शहर निवडणूक प्रमुख
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या वतीने लातूर शहर निवडणूक प्रमुख ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या वर सोपविली.भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षम नेतृत्वावर आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमा
Q


लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाच्या वतीने लातूर शहर निवडणूक प्रमुख ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या वर सोपविली.भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्षम नेतृत्वावर आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमांवर अढळ विश्वास आहे.

पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आणि लातूर शहर निवडणूक प्रमुख ही जबाबदारी सोपवल्याबद्दल आभार मानते अशा शब्दात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केली.

ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ सन्मान नव्हे, तर लातूर शहरात पुन्हा कमळ फुलविण्याचा दृढ संकल्प आहे.असे त्यांनी सांगितले.आपला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ आहे. आगामी निवडणुकीत भाजपा विजय निश्चित करण्यासाठी,साथ – सहकार्य – समन्वय – या त्रिसूत्रीवर आधारित संघटनात्मक कार्यातून प्रत्येक बूथ, प्रत्येक विभागात भाजपा विजयश्री खेचून आणेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande