छ. संभाजीनगरमधील अवैध धंद्यांविरोधात नागरिकांचा संताप
छत्रपती संभाजीनगर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। रामनगर, विठ्ठल नगर, प्रकाश नगर, आंबेडकर नगर, संघर्ष नगर, बजरंग नगर, मुर्तिजापूर, शाहूनगर, तोरणागड तथागत काॅलनी श्रद्धा काॅलनी या भागातील वाढते अवैध धंदे नशेखोर टवाळखोर हुल्लडबाज व गुंड प्रवृत्तीच्या लोकांवि
गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात नागरिकांचा संताप


छत्रपती संभाजीनगर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। रामनगर, विठ्ठल नगर, प्रकाश नगर, आंबेडकर नगर, संघर्ष नगर, बजरंग नगर, मुर्तिजापूर, शाहूनगर, तोरणागड तथागत काॅलनी श्रद्धा काॅलनी या भागातील वाढते अवैध धंदे नशेखोर टवाळखोर हुल्लडबाज व गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात नागरिकांचा संताप उसळला आहे.

सुभाष पांडभरे सचिन वाघ बी. आर. पारसकर व त्यांचे सहकारी यांनी या सर्व समस्यांविरोधात विठ्ठल चौकात आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी काँग्रेस खा. डॉ. कल्याण काळे यांनी भेट देत आंदोलकांची विचारपूस केली.

पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याशी चर्चा करून त्या परिसरात तात्काळ पोलिस चौकी स्थापन करण्याची व नशेखोरांवर कठोर कारवाई करण्याची सूचना कल्याण काळे यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande