
बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)गजानन सहकारी साखर कारखाना लि.राजुरी नवगण .ता बीडयेथील मोळीपूजन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.हा शुभकार्यक्रम श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत श्री शिवाजी बाबा महाराज,स्वामी अमृताश्रम महाराज, ह.भ.प. भक्तीदास महाराज आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाला आमदार संदीप भैय्या क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
गजानन साखर कारखान्याच्या मोळीपूजन व गळीत हंगाम शुभारंभानिमित्त राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) बीड यांची उपस्थिती होती.तसेच मदनराव जाधव, वैजनाथ तांदळे, बाळासाहेब गोरे, अर्जुन क्षीरसागर धनंजय जगताप, माऊली दादा, कर्डिले आबा,घोगरे,सह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis