
बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।भाजप पक्षश्रेष्ठी व कोअर कमिटीने घेतलेला उमेदवार निवडीचा निर्णय सर्वांनी मान्य करून भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करणार असा एकमुखी निर्णय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात घेण्यात आला . गेवराई विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज व कार्यकर्ता मेळावा अत्यंत आज उत्साहात पार पडला.
या मेळाव्यास माजी मंत्री बदामराव आबा पंडित व गेवराई विधानसभा चे नेते बाळराजे दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी व इच्छुक उमेदवारांनी एकमुखाने जाहीर केले की, पक्षश्रेष्ठी व कोअर कमिटीने घेतलेला उमेदवार निवडीचा निर्णय सर्वांनी मान्य करून निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करणार.
या वेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संजय भाऊ आंधळे, जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे, माजी बांधकाम सभापती युधाजित पंडित, समन्वयक श्रीकांत सानप, शिवराजदादा पवार,जिल्हा उपाध्यक्ष सुंदर भाऊ चव्हाण,ता.अध्यक्ष मनोज (काका) पाटिल राजेंद्र पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis