पुणे महापालिकेच्या भांडार विभागातील गैरव्यवहार प्रकरणी मनसेची चौकशीची मागणी
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या भांडार विभागाकडून नऊ वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कापड, साड्या खरेदी केल्या. पण हे साहित्य वाटप न करता गोदामात ठेवून देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी घनकचरा विभागासाठी इकोचिप पावडर खरेदी केली. ती
पुणे महापालिकेच्या भांडार विभागातील गैरव्यवहार प्रकरणी मनसेची चौकशीची मागणी


पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या भांडार विभागाकडून नऊ वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे कापड, साड्या खरेदी केल्या. पण हे साहित्य वाटप न करता गोदामात ठेवून देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी घनकचरा विभागासाठी इकोचिप पावडर खरेदी केली. तीदेखील विनावापर पडून आहे. यात महापालिकेचे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण ठेकेदारांचे बिलही वेळेवर दिले आहे. यात भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भांडार विभागाने २०१५ मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ७५ लाख रुपयांचे गणवेशाचे कापड, ६९.७१ लाखांच्या साड्या खरेदी केल्या. त्याचे पैसे ठेकेदाराला दिले. पण गेल्या नऊ वर्षांत एकाही कर्मचाऱ्‍याला गणवेशाचे कापड, साड्या दिलेल्या नाहीत. हे साहित्य वडगाव बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत पडून आहे. घनकचरा विभागाच्या मागणीनुसार, भांडार विभागाने ५० लाख रुपये खर्च करून ऑगस्ट २०२३ मध्ये २० हजार किलो सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर, ४ हजार लिटर लिक्विड बायोकॅटॅलिस्ट इकोचिपची खरेदी केली. याचा वापर न झाल्याने या पावडरची व लिक्विडमधील रासायनिक घटक कमी झाल्याने त्याचा उपयोग शून्य झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande