
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठीसमोर आज मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवकांसाठी ६६ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.माजी आमदार राजन पाटील, सोलापूर पूर्व निवडणूक प्रमुख माजी आमदार राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, तालुकाध्यक्ष सतीश काळे, नगरपरिषद निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये ता. ८ रोजी हॉटेल शुभममध्ये मुलाखती घेण्यात आल्या.यावेळी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी शीतल सुशील क्षीरसागर, शोभा नागनाथ सोनवणे, शुभांगी नागनाथ क्षीरसागर, यशोदा कांबळे, स्मिता प्रकाश कोकणे, सुनीता छगन अष्टुळ, सारिका किसन गायकवाड, साक्षी रोहित फडतरे, मनिषा विक्रम फडतरे, वर्षा गौतम क्षीरसागर, सरिता संतोष सुरवसे, लक्ष्मी संतोष खंदारे आदी १२ महिला उमेदवारांनी पक्षाकडे संधी देण्याची मागणी केली आहे. तर दहा प्रभागातून नगरसेवकपदासाठी ६६ जणांनी उमेदवारांनी मागणी केली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सतीश काळे व निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड