ओला-सुका कचरा वेगळा न दिल्यास पिंपरी मनपा करणार कारवाई
पिंपरी, 9 नोव्हेंबर (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांतील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा एकत्र दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. ही पथके दररोज कचरा संकलनावेळी कचरा वेगळा केला आहे की
PCMC


पिंपरी, 9 नोव्हेंबर (हिं.स.)पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांतील नागरिकांकडून ओला आणि सुका कचरा एकत्र दिला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र निरीक्षण पथके नियुक्त केली आहेत. ही पथके दररोज कचरा संकलनावेळी कचरा वेगळा केला आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत. कचरा वेगळा न करणारे नागरिक, गृहनिर्माण सोसायट्यांवर, व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घटांगाडीमार्फत संकलित केला जातो. मोशीतील कचरा डेपो येथे हा कचरा टाकला जातो. शहरात दरराेज ओला आणि सुका असा सरासरी १३०० टन कचरा संकलित केला जातो. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचरा वेगळा करून देणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांमधून नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांमध्ये ‘कचरा वेगळे करणे हीच खरी स्वच्छतेची गुरुकिल्ली आहे’ अशी जाणीव दृढ केली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande