प्रथमेश पाटील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। कारखान्याची मासिक बैठक कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर झाला. कारखान्याच्या विद्यमान संचालकाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी दिवंगत संचालक प्रका
प्रथमेश पाटील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी


सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

कारखान्याची मासिक बैठक कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर झाला. कारखान्याच्या विद्यमान संचालकाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी दिवंगत संचालक प्रकाश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कारखान्याच्या सभासदांचे सभासदत्व कायम टिकवन्यापर्यंत त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.शिवाय त्यानंतर कारखाना निवडणुकीत सर्वपक्षीयांना एकत्र घेऊन समविचारी आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे पॅनल बहुमताने निवडून आले नंतर काही महिन्यात प्रकाश पाटील यांचे पुणे येथे अपघातात उपचारादरम्यान त्यांचा निधन झाले. त्यांच्या रिक्त जागी त्यांचे पुत्र प्रथमेश पाटील यांना संधी द्यावी अशी मागणी समविचारी आघाडीतील एका गटाचे प्रमुख भगीरथ भालके यांनी काही महिन्यापूर्वी कारखानास्थळावर केली त्यानंतर हा विषय थांबला होता गत पंधरा दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीची निवडणुकीची चर्चा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पाटील समर्थकांनी प्रथमेश पाटलाच्या निवडीची मागणी लावून धरली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande