
* मुख्यमंत्र्यांकडून दरेकर यांचे अभिनंदन
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनची आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत कवळी-दरेकर पॅनलने सर्वच्या सर्व २७ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी आमदार प्रविण दरेकर हे निवडून आले. विजयी गुलाल उधळल्यानंतर आ. प्रविण दरेकर यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर व विजयी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांचे अभिनंदन केले.
आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी आ. प्रविण यशवंत दरेकर यांना ४३ तर विरोधी पॅनेलच्या रणजित सावरकर यांना शून्य मते मिळाली. ४३ मतांसह दरेकर हे विजयी झाले. मतदार प्रतिनिधीनी दाखवलेला विश्वास सार्थ करू व राज्यात बॉक्सिंगला पुन्हा वैभवाचे दिवस आणू अशी प्रतिक्रिया आ. दरेकर यांनी विजयानंतर दिली. तर उपाध्यक्ष म्हणून पंकज भारसाकळे, मुन्ना कुरणे, मिलिंद साळुंखे, तुषार रंधे, अविनाश बागवे, संग्राम गावंडे, अॅड. गौतम चाबुकस्वार, गौरव चांडक, राजेश देसाई, अॅड. शेख अकबर, वैभव वनकर, संतोष आंबेकर, विक्रांत खेडकर, नील पाटील, कॅप्टन शाहूराज बिराजदार, विजय सोनवणे यांची तसेच सरचिटणीस म्हणून भरतकुमार व्हावळ, खजिनदार म्हणून ॲड. मनोज पिंगळे (बिनविरोध), कार्यकारी सचिव म्हणून शैलेश ठाकूर, प्रशासकीय सचिव म्हणून महेश सकपाळ हे विजयी झाले आहेत. तर विभागीय सचिव म्हणून मयूर बोरसे, मंगेश कराळे, ॲड. संपत साळुंके, अरुण भोसले, विजयकुमार यादव, विजय गोटे हे या आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, आमदार प्रविण दरेकर अध्यक्ष पदी निवडून आल्याने आजीव अध्यक्ष म्हणून किशन नरसी, जय कवळी, कार्याध्यक्ष म्हणून विठ्ठलराव लोखंडकर, सह-कोषाध्यक्ष म्हणून एकनाथ चव्हाण, विभागीय सचिव, मुंबई विभागसाठी विमलेश सिंग आणि विभागीय सचिव, नागपूर विभागसाठी सौरभ मुनघाटे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी