सोलापूर : बेळगाव, बंगळुरूसाठी उद्यापासून विमानसेवा
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। विमानसेवेमुळेसोलापर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडले जात असून, सोलापूर-मुंबई, सोलापूर-गोवा विमानसेवेनंतर आता बेळगांव, बंगळुरुसाठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीने घेतला आहे. 10 नोव्हेंबरपासून
Air Plane


सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

विमानसेवेमुळेसोलापर शहरही हवाई क्षेत्राशी अन्य शहरांना जोडले जात असून, सोलापूर-मुंबई, सोलापूर-गोवा विमानसेवेनंतर आता बेळगांव, बंगळुरुसाठी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय विमानसेवा कंपनीने घेतला आहे. 10 नोव्हेंबरपासून सोलापूर-मुंबई-बेळगाव या हवाई मार्गावर दररोज विमानसेवा मिळणार आहे.तर येत्या 16 नोव्हेंबरपासून दर रविवारी बंगळुरूसाठीही विमानसेवा सुरु झाली असून, त्यासाठी तिकीट बुकिंग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी बंगळुरूसाठी 13 हजार 150 रुपये मोजून एका प्रवाशाने तिकीट घेतल्याचे सांगण्यात आले.सध्या सोलापूर-मुंबईची विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी चार दिवस सुरु आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवा ही आठवड्यातील सातही दिवस सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू अजून मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध न झाल्याने प्रतिक्षेत आहे. येत्या काही दिवसांत स्लॉट उपलब्ध होईल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande