केळीच्या दरात घसरण; २६ रुपये किलोचा दर ३ रुपयांवर, साेलापुरातील उत्पादकांचे हाल
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। दिवाळीपूर्वी २६ रुपये किलो दर असताना अतिवृष्टीनंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडे पाठ फिरवली आहे. तर स्थानिक बाजारात व्यापारी अक्षरशः ३ ते ४ रुपये किलो दराने माल खरेदी करू लागल्याने उत्पादकांना लाखो रुपयांचा फ
सोलापूर केळी


सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।

दिवाळीपूर्वी २६ रुपये किलो दर असताना अतिवृष्टीनंतर निर्यातदार व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडे पाठ फिरवली आहे. तर स्थानिक बाजारात व्यापारी अक्षरशः ३ ते ४ रुपये किलो दराने माल खरेदी करू लागल्याने उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे.जिल्ह्यात यावर्षी केळी पिकाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. दिवाळीपूर्वीपर्यंत निर्यातदार व्यापाऱ्यांनी केळीची खरेदी केली होती. त्यावेळी या निर्यातदार व्यापाऱ्यांनी तब्बल २६ रुपये किलोपर्यंत खरेदी दर दिला होता. त्यानंतर अतिवृष्टी झाल्यावर सारीच स्थिती बदलली. केळीवर करपा रोग पडला. त्यामुळे केळीवर काळे डाग पडले. आता केळी उत्पादकांकडे निर्यातदार व्यापाऱ्यांनी अक्षरशः पाठ फिरवली आहे. एकही व्यापारी केळी उत्पादन क्षेत्रात दिवाळीनंतर फिरकला नाही. त्यामुळे नाइलाजाने केळी उत्पादकांनी निदान देशांतर्गत बाजारात केळी विकण्याचा प्रयत्न केला.सोलापूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक केळी निर्यात करणारा जिल्हा आहे. सोलापूरने जळगावलाही निर्यातीमध्ये मागे टाकले आहे. मात्र, यावर्षी दर कोसळल्याचा केळी उत्पादकांना जोरदार फटका बसला आहे. कृषी खात्याने सर्वाधिक केळी निर्यातीची नोंद केली आहे. मात्र, उत्पादकांना धोरणात्मक मदत करून दिलासा देण्याचे काम अद्याप झालेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande