
जळगाव, 9 नोव्हेंबर (हिं.स.)ऐन दिवाळीपूर्वी विक्रमी पातळी गाठलेल्या सोन्याच्या किमतीत आता मोठी घसरण झाली आहे. लग्नसराई सुरू झाली असतानाच सोन्याचे दर घसरत असल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातारण आहे. या आठवड्यातही सोन्यात घसरण दिसून आली. आठवडाभरात २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ११६० रूपयांनी घसरण झाली आहे. तर २४ कॅरेटचे सोनं प्रति १० ग्रॅम ९८० रूपयांनी स्वस्त झाले आहे.तज्ज्ञांच्या मते, अमेरिकनं फेडरल रिझर्व्ह बँकची वॅट अॅण्ड वॉच भूमिका, डॉलरचे दरात वाढ या कारणामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे दर सातत्याने कमी जास्त होत आहे. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोघांच्याही नजरा बाजारातील हालचालीवर केंद्रित आहेत.या आठवड्यात सोने दरात घसरण झालीय. सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १,२२,०२० रुपयावर आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,१२,००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. आठवडाभरात सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळालाय. पण दुसरीकडे चांदीच्या किंमतीमध्ये मात्र वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात चांदीची किंमत प्रति किलो ५०० रूपयांनी वाढली आहे. देशात चांदीची किंमत प्रति किलो ₹1,52,500 इतकी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर