खडकवासला धरणाजवळील जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी २.६६ कोटींची निविदा जाहीर
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। कुंडमळा येथे पूल पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने शहरातील पुलांची तपासणी केली होती. त्यात खडकवासला धरणाच्या समोरील ६० वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीची आवश्‍यकता असल्याने सुमारे २ लाख ६६ लाख रुपयांची निविदा काढ
खडकवासला धरणाजवळील जुन्या पुलाच्या दुरुस्तीसाठी २.६६ कोटींची निविदा जाहीर


पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। कुंडमळा येथे पूल पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने शहरातील पुलांची तपासणी केली होती. त्यात खडकवासला धरणाच्या समोरील ६० वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीची आवश्‍यकता असल्याने सुमारे २ लाख ६६ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

खडकवासला गावातून वारजे, शिवणे, कुडजे या भागाला जोडणारा पूल खडकवासला धरणाच्या खालच्या भागात बांधलेला आहे. खडकवासला गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर या पुलाची देखभाल दुरुस्तीही महापालिकेला करावी लागते. पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर या पुलावर पर्यटक गर्दी करतात. हा पूल अरुंद असून, दोन मार्गीका आहे, त्यामुळे येथे कोंडीही होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande