सोलापूर - जिल्ह्यात टोल फ्री तक्राराची सोय नाही
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। यंदाच्या वर्षी अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, शासनाच्यावतीने नुकसान भरपाई दिली जात आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाई संदर्भात माहिती आणि तक्रार करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना टोल
सोलापूर - जिल्ह्यात टोल फ्री तक्राराची सोय नाही


सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। यंदाच्या वर्षी अतिवृष्टी, पुरामुळे मोठ्याप्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले, शासनाच्यावतीने नुकसान भरपाई दिली जात आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाई संदर्भात माहिती आणि तक्रार करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. परंतू सोलापूर जिल्हा प्रशासनाने तशी सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत अतिवृष्टी आणि सीना, भीमा नदीला पूर आल्याने खरिप हंगामातील पिकांची आतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सात लाख 64 हजार शेतकऱ्यांना 867 कोटी 38 लाख रुपये मंजूर असून, आतापर्यंत तीन लाख 41 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 409 कोटी 20 लाख रुपये जमा झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande