बीडमध्ये श्री व्यंकटेश बालाजी भगवानांचा ब्रह्मोत्सव २०२५ भक्तिमय वातावरणात संपन्न
बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)श्री बालाजी मंदिर संस्थान, बीड यांच्या वतीने आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवानांचा ब्रह्मोत्सव २०२५ अत्यंत भव्य व भक्तिमय वातावरणात पार पडला.आज रविवारी झालेल्या भव्य रथोत्सवात बाहुबली हनुमान व बाहुबली नरसिंह अवतार हे प्रमुख
अ


बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)श्री बालाजी मंदिर संस्थान, बीड यांच्या वतीने आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवानांचा ब्रह्मोत्सव २०२५ अत्यंत भव्य व भक्तिमय वातावरणात पार पडला.आज रविवारी झालेल्या भव्य रथोत्सवात बाहुबली हनुमान व बाहुबली नरसिंह अवतार हे प्रमुख आकर्षण ठरले. आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या समवेत अनेक जण सहभागी झाले. या दिव्य उत्सवात सहभागी होऊन भगवान व्यंकटेश बालाजींचे दर्शन घेतले तसेच भक्तिभावाने भरलेल्या या क्षणांचा आनंद लुटला.यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात अनुभवलेले हे क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरले.

-

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande