
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका आमदार विक्रम काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या.
लातूर शहरातील होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या कार्यालयात जाऊन शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व जोमाने तयारी करून लातूर मनपा वर राष्ट्रवादीचा झेंडा आपणाला फडकवायचा आहे, हा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी शहर कार्याध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, शहर महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रणिताताई सूर्यवंशी, प्रदेशचे श्री.मुर्तजा खान,अंकुशराव नाडे,लाला सुरवसे, नवनाथ आल्टे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
रेनापुर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख तालुका व शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षनिरीक्षक श्री.गजानन भोपनीकर व सौ.प्रणिताताई सूर्यवंशी, सौ.धर्माधिकारी देशमुख मॅडम, कार्याध्यक्ष प्रा. अंकुश नाडे सर इत्यादी मान्यवरांसमवेत संपन्न झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis