
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे पक्षाला चांगली च ताकद मिळाली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगरपरिषद व अनगर नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी भाजपा कमळ या चिन्हावर लढेल व त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकविला जाईल असे प्रतिपादन सोलापूर पूर्व निवडणूक प्रमुख माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, मोहोळ शहरच्या वतीने मोहोळ नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकी च्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी आमदार राजन पाटील ,उपाध्यक्ष प्रकाश चवरे, सुरेश राऊत, सरचिटणीस विकास वाघमारे,चिटणीस महेश सोवनी, तालुकाध्यक्ष सतीश काळे, रमेश माने, सोमेश क्षीरसागर, मोहोळ नगरपरिषद निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर आदींच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.यावेळी 66 इच्छुक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी तर 12 महिलांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या.त्यावेळी माजी आमदार सातपुते बोलत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड