
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)।
पी. एम. शाह फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे १४वा आरोग्य चित्रपट महोत्सव शुक्रवार (ता. १२) व शनिवारी (ता. १३) विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी) येथे होणार आहे. हा सर्वांसाठी खुला आहे.उद्घाटन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते व पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर. यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १२) दुपारी दोन वाजता होईल. देशविदेशातून या महोत्सवासाठी १४५ लघुपट, माहितीपट आले होते. त्यापैकी निवड झालेले ३१ लघुपट व माहितीपट यावेळी दाखविण्यात येतील. मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य व बाललैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आदी त्यांचे विषय आहेत. माहितीपट व लघुपटांच्या निवड प्रक्रियेचे काम समीक्षक, आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर, डॉ. लीना बोरुडे व सामाजिक कार्यकर्त्या नीता मेहता यांनी केले आहे. महोत्सवात दाखविण्यात येणारे लघुपट, माहितीपट हे विविध भाषांमधील असले तरीही त्यासाठी इंग्रजी सबटायटल्स असतील, अशी माहितीही अॅड. गांधी यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु