
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। बारामती तालुक्यातील जालोचीवाडी येथे ईडीने अचानक धाड टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची ही कारवाई होत असून १० कोटींची दूध डेअरीवाल्यांना फसवणूक केल्या प्रकरणात हा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. लोखंडे दाम्पत्याने दूध व डेअरी उत्पादनात गुंतवणूक केल्यास डबल नफा मिळेल असे अमिष दाखवत अनेकांना फसवल्याचा आरोप आहे. पुणे–मुंबईतील डेअरी व्यावसायिकांसह तब्बल १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार झाली आहे. मुंबई युएडब्ल्यूकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनाही या जाळ्यात अडकवण्यात आल्याचे समोर आले आहे. आनंद लोखंडे हे आमदार रोहित पवार यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असून, त्यांच्या राजकीय ओळखीमुळे कारवाई होत नाही अशी नाराजी व्यक्त होत होती. मात्र ईडीने अचानक छापा टाकल्यानंतर या प्रकरणाने वेग घेतला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु