नाताळच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या
अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। नाताळसह नवीन वर्षानिमित्त हिवाळी सुट्ट्या घालविण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठीमध्यरेल्वेने मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. य
नाताळ, नवीन वर्षानिमित्त प्रवास करणाऱ्यांना दिलासा  अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय


अमरावती, 10 डिसेंबर (हिं.स.)। नाताळसह नवीन वर्षानिमित्त हिवाळी सुट्ट्या घालविण्यासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठीमध्यरेल्वेने मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर, पुणे-अमरावती दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष (सहा सेवा) ड ०१००५ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) पहाटे ००:३० वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी ०३:३० वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१००६ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान दर शनिवारी नागपूरहून सायंकाळी ०६:१० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दादरसह ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकांवर थांबा असेल. दोन एसी-२ टायर, आठ एसी-३ टायर, सहा स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल. पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (सहा सेवा) ०१४०१ साप्ताहिक विशेष गाडी १९ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून रात्री ०८:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२:०५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१४०२ साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर ते तीन जानेवारी दरम्यान दर शनिवारी - नागपूरहून दुपारी ०४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:४५ वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबा असेल. चार एसी-३ टायर, आठ स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल. पुणे-अमरावती-पुणे साप्ताहिक विशेष (सहा सेवा) ०१४०३हीसाप्ताहिकविशेषगाडी २० डिसेंबरते ०३ जानेवारीदरम्यान दर शनिवारी पुण्याहून रात्री ०७ : ५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:२५ वाजता अमरावतीला पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. ०१४०४ ही साप्ताहिक विशेष गाडी २१ डिसेंबर ते ०४ जानेवारी दरम्यान दर रविवारी अमरावतीहून दुपारी १२ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ००:१५ वाजता पुण्यात पोहोचेल. या गाडीच्या एकूण तीन फेऱ्या होतील. दोन्ही गाड्यांना दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा स्थानकांवर थांबा असेल. चार एसी-३ टायर, सात स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनसह डब्यांची रचना असेल. विशेषगाडी क्रमांक ०१४०३ आणि०१४०४ या गाड्यांचे आरक्षण १० डिसेंबरपासून सुरू होईल. तसेच विशेष गाडी क्रमांक ०१००५, ०१००६, ०१४०१,०१४०२ आणि०१४०५ यागाड्यांचे आरक्षणसर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेचhttp://www.irctc.co.inया संकेतस्थळावर सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande