उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत चंद्रकांत बिराजदार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
लातूर, 10 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी लातूर येथील माजी उपमहापौर श्री. चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
अ


लातूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बुधवारी लातूर येथील माजी उपमहापौर श्री. चंद्रकांत बिराजदार यांसह अन्य मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे अलीकडेच लातूरचे माजी महापौर यांनी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष परिवारात सर्वांचं मनापासून स्वागत केलं, पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा नवीन सहकाऱ्यांना समजावून सांगितली, त्या विचारांवर इमानेइतबारे चालण्याचा संकल्प त्यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande