
सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। होम मैदानावर क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाला. नरेंद्र नागराज गुडशेलु (वय ४२ रा. हुडको कॉलनी नं ३, कुमठा नाका) मृताचे नाव आहे.
बेशुद्ध व्यक्तीचा उपचारापूर्वीच सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला आहे. ते महापालिकेचे कर्मचारी आहेत. पालिका कर्मचाऱ्यांचा क्रिकेट संघ असून या संघाचे सामने शासकीय मैदानावर होणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा संघ हा होम मैदानावर क्रिकेटचा सराव करीत होता. त्या टीममध्ये नरेंद्र हा देखील होता.
नेहमीप्रमाणे होम मैदानावर संघातील इतर सहकाऱ्यांसोबत क्रिकेटचा सराव करताना त्यास अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. बेशुद्ध अवस्थेत त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यानंतर नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. दरम्यान सिव्हिलमध्ये तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत झाला होता. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड