
लातूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। लातूर पोलिसांनी मकरसंक्रांतीपूर्वी नायलॉन/चायनीज मांजा विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. NGT च्या आदेशानुसार अशी मांजा वापरणे, विक्री, साठवणूक, तयार करणे हा थेट गुन्हा असून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष दक्षता सूचना देण्यात आल्या आहेत.
बाजारपेठ, क्रीडा साहित्य दुकाने, घाऊक विक्रेते आणि ऑनलाइन विक्रीवर कडक नजर ठेवली जात आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर BNS 281, 273, 336, 337/338 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) अंतर्गत तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
दुकानदारांकडील प्रतिबंधित मांजा जप्त करण्यात येणार असून लातूर पोलिसांचे आवाहन —“नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये; कुठे विक्री दिसल्यास लगेच पोलिसांना कळवावे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis