
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।
संसदीय हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील, विशेषतः नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न नांदेडची भाजपचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी मांडला.
महाराष्ट्रातील नांदेड जिल्यात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने उद्भवणाऱ्या एका अत्यंत गंभीर विषय म्हणजेच नांदेड जिल्यातील बिलोली, धर्माबाद व देगलूर तालुक्यांतील ८० पेक्षा अधिक गावे दरवर्षी तेलंगणातील श्रीराम सागर प्रकल्प पोचमपाड जलाशय यांच्या अवैज्ञानिक, असमन्वयित व एकतर्फी जलसंचालनामुळे भीषण पूरस्थितीला सामोरे जात आहेत. या पूरस्थितीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांची संपूर्ण शेती जमीन पाण्याखाली जाते. संगम, माचनूर, हुनगुंदा, मनुर, नागणी यांसारख्या गावांतील शेती जमीन दरवर्षी पूर्णतः जलमय होते, तर उर्वरित अनेक गावांतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेती जमीन बाधित होते. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis