
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेच्या अनुषंगाने आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या दामिनी पथकाकडून सुरू आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरातील शाळा-महाविद्यालयांत जाऊन या पथकातील कर्मचारी विद्याथिनींचे समुपदेशन करीत आहेत. काही अडचणी असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. नांदेड शहरातील अनेक भागात असलेल्या शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थिनींच्या छेडखानीच्या घटनांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठी वाढ झाली होती.
शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना 'गुड टच बॅड टच'ची माहिती दामिनी पथकातील कर्मचारी देत आहेत. चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा, याची उदाहरणेही समजून सांगितली जात आहेत. जर कोणी आपल्याला बेंड टच करीत आहे, वाईट स्पर्श करीत आहे तर तातडीने शिक्षक, पालक अथवा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या छेड़खानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने फार घ्यावा आणि कायद्याचा बडगा उगारावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्याकडूनही करण्यात येत होती. साध्या कपड्यातील पोलीस कर्मचारी आणि वर्दीतील पोलीस कर्मचारी दामिनी पथकाच्या माध्यमातून केली जात आहे.
शालेय विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक शहरातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, शाळा-महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधत आहेत. जर एखाद्या विद्यार्थिनीवी कोणी छेड काढत असेल किंवा अशा घटना घडत असतील तर त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis