नांदेड - माळेगाव येथील वार्षिक यात्रा 18 ते 24 डिसेंबरपर्यंत चालणार
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील वार्षिक यात्रा उत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी भव्य प्रमाणात आयोजित केली जाणारी ही यात्रा यंदाही विविध सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांनी सजणार आहे. 18 डिसेंबर
नांदेड - माळेगाव येथील वार्षिक यात्रा 18 ते 24 डिसेंबरपर्यंत चालणार


नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील वार्षिक यात्रा उत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी भव्य प्रमाणात आयोजित केली जाणारी ही यात्रा यंदाही विविध सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा कार्यक्रमांनी सजणार आहे. 18 डिसेंबरपासून सुरू होणारी यात्रा 24 डिसेंबरपर्यंत चालणार असून पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे:

• 18 डिसेंबर – देवसवारी

• 19 डिसेंबर – पशुप्रदर्शन

• 20 डिसेंबर – कुस्त्यांचा भव्य दंगल

• 22 डिसेंबर – लावणी महोत्सव

• 23 डिसेंबर – कला महोत्सव

• 24 डिसेंबर – भव्य बैलगाडा शर्यत

या यात्रेच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून माळेगाव यात्रा नेहमीप्रमाणेच यंदाही भव्यतेने पार पडण्याची अपेक्षा आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande