पुणे महापालिका झाडे मोजण्यासाठी करणार तब्बल ३१ कोटींचा खर्च
पुणे, 10 डिसेंबर, (हिं.स.)। महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप मान्य झालेला नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करत महापालिकेच्या उद्यान विभागाने या गावातील वृक्षगणना करण्यासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
PMC news


पुणे, 10 डिसेंबर, (हिं.स.)। महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप मान्य झालेला नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करत महापालिकेच्या उद्यान विभागाने या गावातील वृक्षगणना करण्यासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. शहर भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या हट्टासाठी हा खर्च करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.महापालिकेच्या उद्यान विभागाने काढलेल्या ३१ कोटी रुपयांच्या निविदेची सखोल चौकशी करून ही उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंदे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त राम यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. महानगरपालिका ह‌द्दीमधील वृक्षांची ‘भौगोलिक माहिती प्रणाली’ (जी.आय.एस) तंत्रज्ञान वापरून वृक्ष गणना करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने ही निविदा काढली आहे. सुमारे ३१ कोटी रुपयांची ही निविदा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande