
जयपूर , 10 डिसेंबर (हिं.स.) राजस्थानमध्ये 50 प्रवाशांनी भरलेली एक बस अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये सर्व भाविक होते, जे वैष्णोदेवीची यात्रा करून परतत होते आणि खाटू श्यामच्या दर्शनासाठी जात होते.
माहितीनुसार, ही घटना राजस्थानातील जयपूर–बीकानेर महामार्गाजवळ मंगळवार रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली. फतेहपूरजवळ बस अचानक ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की 3 प्रवाशांनी जागीच प्राण सोडले.
फतेहपूरचे एसएचओ महेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक स्लीपर बस होती आणि त्यात सुमारे 50 प्रवासी होते. अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 28 जखमी झाले आहेत. यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी प्रकरण नोंदवले असून तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode