दिल्लीमध्ये संघ शताब्दीनिमित्त सामाजिक-सांस्कृतिक जनजागृतीवर विचारमंथन
– दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि इंद्रेश कुमार लावणार कार्यक्रमाला हजेरी नवी दिल्ली, 10 डिसेंबर (हि.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त गुरुवार (11 डिसेंबर) रोजी दुपारी 12.30 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील स
पद्मश्री राम बहादूर राय, समूह संपादक हिंदुस्थान समाचार


इंद्रेशकुमार, संयोजक राष्ट्रीय मुस्लिम मंच


रेखा गुप्ता, मुख्यमंत्री दिल्ली


अरविंद मार्डीकर , अध्यक्ष हिंदुस्थान समाचार


– दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि इंद्रेश कुमार लावणार कार्यक्रमाला हजेरी

नवी दिल्ली, 10 डिसेंबर (हि.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त गुरुवार (11 डिसेंबर) रोजी दुपारी 12.30 वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रातील समवेत सभागृहात हिन्दुस्थान समाचारतर्फे “सामाजिक-सांस्कृतिक चेतना आणि संघ” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशात सामाजिक व सांस्कृतिक चेतना जागृत करणे आणि संघाचे योगदान जनतेसमोर प्रभावीपणे मांडणे हा आहे.

कार्यक्रमाचे संयोजक व हिन्दुस्थान समाचारचे प्रादेशिक संपादक डॉ. राजेश तिवारी यांनी बुधवारी सांगितले की या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिन्दुस्थान समाचार समूहाचे संपादक आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे अध्यक्ष रामबहादुर राय असतील. तसेच हिन्दुस्थान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद भालचंद्र मार्डीकर विशेष उपस्थिती नोंदवतील. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार आधुनिक समाजातील सांस्कृतिक चेतना आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व या विषयावर आपले विचार मांडतील. मुख्यमंत्री रेखा गुप्ता मुख्य अतिथी म्हणून सामाजिक जागृती व युवकांमधील नेतृत्वक्षमता वृद्धीवर भाष्य करतील. इस्कॉन बेंगळुरूचे उपाध्यक्ष भारतर्षभ दास हे कार्यक्रमाचे विशिष्ट अतिथी असतील असे तिवारी यांनी सांगितले.

संयोजक डॉ. तिवारी म्हणाले की, संघाची शताब्दी यात्रा संघर्ष, सेवा, समर्पण, संघटन आणि संस्कारांनी समृद्ध अशी राहिली आहे. संघाचे मत आहे की भारताच्या संस्कृतीत अंतर्भूत असलेली मूल्येच राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम आहेत. समता व बंधुभावावर आधारित समाज निर्माण करणे हेच संघाचे ध्येय आहे. प्रत्येकाने आपल्या राष्ट्राला कोणत्या दिशेने घेऊन जायचे व त्यात आपला सहभाग काय असावा, हे समजून घेणे आवश्यक आहे. संघ आपल्या स्वयंसेवकांना भारत-बोधाने प्रेरित करून निस्वार्थ सेवा व निष्काम कर्माची शिकवण देतो. हे सर्व जीवनात अध्यात्माच्या समावेशातूनच शक्य होते, असे तिवारी म्हणाले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande