सोलापूर - नान्नजजवळ अपघातात दोघांचा मृत्यू
सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर-बार्शी मार्गावरील नान्नज (ता. उत्तर सोलापूर) जवळील एका हॉटेलजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वेगाने एसटी बसच्या उजव्या बाजूस धडकली. यात ब
सोलापूर - नान्नजजवळ अपघातात दोघांचा मृत्यू


सोलापूर, 10 डिसेंबर, (हिं.स.)। सोलापूर-बार्शी मार्गावरील नान्नज (ता. उत्तर सोलापूर) जवळील एका हॉटेलजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वेगाने एसटी बसच्या उजव्या बाजूस धडकली. यात बसच्या समोरील भागाचा पत्रा फाटून पूर्ण दुचाकी बसखाली घुसली होती.

अपघातात मृत्यू झालेले दोन्ही तरुण सोलापूर शहरातील असून केटरिंग व्यवसायात काम करणारे आहेत. दुचाकी चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेबाबत पोलिस व घटनास्थळावरील उपस्थितांकडून मिळालेली माहिती अशी, बार्शीहून प्रवासी घेऊन सोलापूरकडे जात असलेल्या एमएच ११/बील ९२६६ या क्रमांकाची एसटी बस व सोलापूरहून बार्शीकडे जाणाऱ्या एमएच १३/ईयू ७५४२ या क्रमांकाच्या दुचाकीची नान्नजजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. या दुचाकीवरील अतुल ऋषीकेश तिवारी (वय २४, सध्याचा पत्ता महेशनगर, मार्केट यार्ड, सोलापूर) या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande