विद्यार्थी धर्म' पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक -न्या. सुनील वेदपाठक
नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)। आज तरुण पिढी भरकटत चालली आहे, त्यांना दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थी धर्म पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी
विद्यार्थी धर्म' पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक -न्या. सुनील वेदपाठक


नांदेड, 10 डिसेंबर (हिं.स.)।

आज तरुण पिढी भरकटत चालली आहे, त्यांना दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थी धर्म पुस्तक विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव लिखित विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे शंकरराव चव्हाण सभागृहात प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत, मनोज बोरगावकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हा व सत्र न्यायाधीश वेदपाठक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सुरज गुरव यांच्यासारखे बनता आले नाही, तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावा. त्यांचा आदर्श घ्यावा. आजची पिढी भरकटत जात असून लग्न केल्यानंतर आमच्याकडे घटस्फोटासाठी येतात. त्यांना कारण विचारल्यावर ते म्हणते तो त्यावेळी खूप कविता करत होता, आता नुसत प्रेम करत असून काम काहीच करत नाही, नंतर पश्चातापात पडण्यापेक्षा आजच्या पिढीने विद्यार्थी धर्म काय आहे, हे या पुस्तकातून समजावून घेतले पाहिजे, आणि ते त्यांचे आचरण केले पाहिजे, असे ते म्हणाले.

पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप म्हणाले, सुरज गुरव यांना गडकिल्ल्यापासून जे आकर्षण निर्माण झाले, यात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणले. यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, तरुण पिढी या पुस्तकामुळे चांगल्या मार्गावर निश्चित पद्धतीने मार्गक्रम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. सुरेश सावंत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह आदींनी मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक तसेच विद्यार्थी धर्म या पुस्तकाचे लेखक सुरज गुरव यांनी केले. या कार्यक्रमास पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मोठ्या प्रमाणात नागरिक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande