महिला सक्षमीकरणासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनचा 'साई' येथे पुढाकार
- ६३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान लातूर, 10 डिसेंबर (हिं.स.)। विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने साई येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. महिला सक्षमीकरणाच्या या उपक्
महिला सक्षमीकरणासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनचा 'साई' येथे पुढाकार; ६३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान


- ६३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान

लातूर, 10 डिसेंबर (हिं.स.)।

विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने साई येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या ६३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन ॲग्री लि. च्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या पुढाकारातून हे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात आले होते. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि स्वयंरोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.

साई येथील या प्रशिक्षण केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे व्यावसायिक शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती, डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान महिलांना देण्यात आले. प्रशिक्षक क्रांती उफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ६३ महिलांनी शिलाई कामातील कला आणि कौशल्ये आत्मसात केली.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, गावचे उपसरपंच अमोल पवार, प्रशिक्षक क्रांती उफाडे, गजानन बोयणे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande