पाकिस्तानी सरकारचा तुरुंगाबाहेर बसलेल्या इमरान खानच्या वृद्ध बहिणींवर बर्फाळ पाण्याचा फवारा
इस्लामाबाद , 10 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त माजी पंतप्रधान इमरान खान आणि तेथील सेना यांच्यात संघर्ष चिघळला आहे. इमरान खान यांना भेटण्याची परवानगी मिळावी यासाठी अदियाला तुरुंगाच्या बाहेर सुरू असलेल्या त्यांच्या बहिणी आणि त्यांच्य
पाकिस्तानी सरकारचा तुरुंगाबाहेर बसलेल्या इमरान खानच्या वृद्ध बहिणींवर बर्फाळ पाण्याचा फवारा


इस्लामाबाद , 10 डिसेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त माजी पंतप्रधान इमरान खान आणि तेथील सेना यांच्यात संघर्ष चिघळला आहे. इमरान खान यांना भेटण्याची परवानगी मिळावी यासाठी अदियाला तुरुंगाच्या बाहेर सुरू असलेल्या त्यांच्या बहिणी आणि त्यांच्या पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) च्या सदस्यांच्या धरन्यावर थंड हिवाळ्यात थंड पाण्याच्या जोरदार फवार्‍या मारण्यात आल्या.

पहाटे 3:58 वाजता सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पीटीआय ने म्हटले, “माजी पीएम इमरान खान यांना भेटण्याची न्यायालयाने परवानगी दिल्याचे आदेश असूनही, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अदियाला तुरुंगाच्या बाहेर शांततेने बसलेल्या इमरान खान यांच्या बहिणींना आणि पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी वॉटर कॅनन वापरले.” पक्षाने पुढे म्हटले, “शांततापूर्ण धरन्यावर केलेली ही क्रूर कारवाई केवळ मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन नाही, तर अशा थंडीत एकत्र येण्याच्या स्वातंत्र्यावरही प्रहार आहे!”

पीटीआय ने याबरोबरच पाण्याच्या फवार्‍यांचा एक व्हिडिओही शेअर केला, ज्यात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी धावताना दिसतात. एका अन्य पोस्टमध्ये पक्षाने दावा केला की इमरान खान यांच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक भेटीपासून रोखण्यात आले, त्यामुळे त्यांना हा धरना द्यावा लागला. पक्षाचे म्हणणे आहे की पाण्याच्या फवार्‍या मारणे हे केवळ इमरान खान यांच्या कैदी म्हणून असलेल्या अधिकारांचे उल्लंघन नाही, तर अत्याचाराविरोधात शांततेने एकत्र जमलेल्या लोकांच्या संवैधानिक अधिकारांवर थेट हल्ला आहे.पक्षाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना आवाहन केले, “पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या अशा अमानवी आणि हुकूमशाही कृतींकडे जग शांत राहू नये.”

मीडिया रिपोर्टनुसार, इमरान खान यांच्या मोठ्या बहिणी अलीमा खान यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अदियाला तुरुंगाच्या बाहेर धरना सुरू होता. कारण—त्यांना पुन्हा एकदा इमरान खान यांना भेटू देण्यात आले नव्हते.धरन्यात पीटीआय चे वरिष्ठ नेते, महासचिव सलमान अकरम राजा, केपीके प्रांतीय अध्यक्ष जुनैद अकबर खान, इत्यादीही सहभागी झाले होते.

पोलिसांनी इमरान खान यांच्या बहिणींशी दोनदा चर्चा करून त्यांना तिथून जाण्यास सांगितले, परंतु त्या भावाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत यावर ठाम राहिल्या. नंतर मोठ्या प्रमाणात पोलिस फौज घटनास्थळी तैनात करण्यात आली.दरम्यान, गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांनी इमरान खान यांच्या दुसऱ्या बहिणीस उझ्मा खान यांना भेटण्याची परवानगी दिली होती. भेटीनंतर उझ्मा खान म्हणाल्या की इमरान शारीरिकदृष्ट्या ठीक दिसत आहेत, परंतु त्यांना तुरुंगात “मानसिक छळ” सहन करावा लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande