मी फक्त एका फोन कॉलने थायलंड- कंबोडियामधील संघर्ष थांबवेन- ट्रम्प
वॉशिंग्टन , 10 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते एका फोन कॉलद्वारे थायलंड आणि कंबोडियामधील सुरू असलेला संघर्ष थांबवू शकतात. त्यांनी असेही सांगितले की ते ताकदीच्या बळावर शांतता प्रस्थापित करत आहेत.यावेळी
मी फक्त एका फोन कॉलने थायलंड- कंबोडियामधील संघर्ष थांबवेन- ट्रम्प


वॉशिंग्टन , 10 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की ते एका फोन कॉलद्वारे थायलंड आणि कंबोडियामधील सुरू असलेला संघर्ष थांबवू शकतात. त्यांनी असेही सांगितले की ते ताकदीच्या बळावर शांतता प्रस्थापित करत आहेत.यावेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की त्यांनी दहा महिन्यांच्या आत आठ संघर्ष थांबवले आहेत. यात कोसोव्हो–सर्बिया, भारत–पाकिस्तान यांच्यातील तणावही समाविष्ट आहे.

ट्रम्प म्हणाले, “हे देश एकमेकांशी भिडत होते. इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, आर्मेनिया आणि अझरबैजान. मला हे म्हणताना वाईट वाटते, पण कंबोडिया आणि थायलंडने आज पुन्हा सुरुवात केली आहे. मी एक फोन कॉल करेन आणि या दोन शक्तिशाली देशांमधील संघर्ष थांबवून दाखवेन. ते पुन्हा लढत आहेत, पण हे मी करून दाखवीन. आम्ही ताकदीच्या जोरावर शांतता निर्माण करत आहोत.”

दरम्यान, थायलंडच्या सुरिन भागात मंगळवारी परिस्थिती अधिकच बिघडली, कारण कंबोडियाचे प्रभावशाली नेता आणि सिनेट अध्यक्ष हुन सेन यांनी स्पष्ट केले की त्यांचा देश थायलंडशी सामना करेल. दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या दिवशीही गोळीबार झाला आणि सीमेजवळील वसाहतींमधून मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करत आहेत.

या ताज्या संघर्षाची सुरुवात रविवारी झाली, जेव्हा झालेल्या चकमकीत दोन थाई सैनिक जखमी झाले. यामुळे जुलैमध्ये झालेला संघर्ष थांबवण्यासाठी तयार केलेला शांतता करार मोडला गेला. कंबोडियाच्या सैन्यानुसार, ताज्या संघर्षात सात नागरिकांचा मृत्यू झाला आणि 20 जखमी झाले. तर थाई सैन्याचे म्हणणे आहे की त्यांच्या तीन सैनिकांचा मृत्यू झाला. थायलंडने सोमवारी सीमेच्या जवळ हवाई हल्ले केले आणि गोळीबार थांबेपर्यंत अशी कारवाई सुरूच राहील, असे सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande