पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा उपचारावेळी मृत्यू, रुग्णालयात तोडफोड
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडलीय. हडपसरमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते. पण बुधवारी शस्त्रक्रियेवेळी त्
पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा उपचारावेळी मृत्यू, रुग्णालयात तोडफोड


पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)।

पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना घडलीय. हडपसरमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर उपचार सुरू होते. पण बुधवारी शस्त्रक्रियेवेळी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर सपकाळ यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड केली. रुग्णालयाचा काचेचा दरवाजा फोडण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदे गटाचे हडपसरमधील पदाधिकारी अजय सपकाळ यांच्या वडिलांवर शस्त्रक्रिया होणार होता. त्यांना अल्सरचा त्रास होता. फक्त दोन टाक्यांची शस्त्रक्रिया होती पण रुग्णालयाकडून माझ्या वडिलांना डॅमेज करण्यात आलं असा आरोप अजय सपकाळ यांनी केला. मी शिंदे गटाचा वैद्यकीय कक्षाचा शहर प्रमुख असून माझी अशी स्थिती तर सामान्यांची अवस्था काय असेल? हे रुग्णालय थर्डक्लास आहे, रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अजय सपकाळ यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande